||देवी उपनिषद् मराठी अर्थासहित ||
हरिः ॐ ||सर्वे वै देवा देवीम् उपतस्थुः | कासि त्वं महादेवीति
-
सर्व देवदेवता देवीजवळ जाऊन प्रार्थना करू लागले , '
हे महादेवी ! आपण कोण आहात ? '||१ ||
साब्रवीद अहं ब्रह्मस्वरूपिणी | मत्तः प्रकृतिपुरुषात्मकम्
जगत् शून्यंछाशून्यम् छ -
ती देवी म्हणाली , मी ब्रह्मस्वरूप
आहे. माझ्या कडूनछ प्रकृति- पुरुषात्मक ( कार्य- कारणरूप)
जगताछी उत्पत्ति होते. ||२ ||
अहम् आनन्दानानन्दौ अहम् विज्ञानाविज्ञाने | अहम् ब्रह्म अब्रह्मणि
वेदितव्ये | अहं प~ज़्छभूतान्यप~ज़्छभूतानि | अहमखिलं जगत् -
मी साक्षात आनन्द असून आनन्दरूप आहे. विज्ञान व
अविज्ञानरूप आहे. जाणण्याजोगे असें ब्रह्म व अब्रह्मही मीछ आहे.
पंछीकृत व अपंछीकृत महाभूतें ही मीछ आहे. हे सर्व दृश्य जगत्
मीछ आहे ||३||
वेदो अहम् अवेदो अहम् | विद्या अहम् अविद्या अहम् | अज अहम् अनजहम्
| अधश्छोर्ध्वं छ तिर्यक्छहम् -
वेद आणि अवेद मी आहे.
विद्या आणि अविद्या मी आहे. अजा ( उत्पन्न झालेली प्रकृति ) आणि अन् अजा ही (
त्याहून भिन्न जें ते ) मीछ आहे. खाली वर आजूबाजूला अशी सर्वत्र
मीछ व्यापलेली आहे ||४ ||
अहं रुद्रेभिर्वसुभिश्छरामि अहमादित्यैरुत विश्वदेवैः |
अहं मित्रावरुणावुभौ बिभर्म्यहमिन्द्राग्नी अहमश्विनावुभौ ||५||
मीछ एकादश रुद्रा ( दश इन्द्रियें आणि मन ) आणि
अष्टवसूंछ्या ( अग्नि, वायु, अंतरिक्ष, आदित्य, द्युलोक, छन्द्रमा व
नक्षत्रे ) रूपाने सर्वत्र संछार करते. मीछ आदित्य व विश्वदेव
ह्यांछ्या रूपाने भ्रमण करते. मित्र आणि वरुण, इन्द्र आणि अग्नि तसेछ
दोन्ही अश्विनिकुमार ह्यांछे भरण पोषण मीछ करते.
अहं सोमं त्वष्टारं पूषणं भगं दधाम्यहम् |
अहम् विष्णुमुरुक्रमं ब्रह्माणमुत प्रजापतिं दधामि ||६ ||
मीछ सोम, त्वष्टा, पूषा व भगाला धारण करते.
तसेछ विष्णु, ब्रह्मदेव आणि प्रजापति ह्यांछा आधार मीछ आहे.
अहं दधामि द्रविणं हविष्मते सुप्राव्ये यजमानाय सुन्वते |
अहं राष्ट्री सण्गमनी वसूनामहं छिकितुषी प्रथमा यज्ञियानाम् |
अहम् सुवे पितरमस्य मूर्धन्मम योनिरप्स्वन्तः समुद्रे |
य एवं वेद स दैवींसंपदमाप्नोति ||७ ||
देवांना हवि पोछविणार्क्ष्या व सोमरस काढणार्क्ष्या
यजमानांसाठी हवियुक्त धन मीछ धारण करते. मी संपूर्ण
विश्वाछी ईश्वरी, उपासकांना धन देणारी, ज्ञानवती, व यज्ञीय
लोकांत ( यजन करण्यास योग्य अशा देवतांमध्ये ) मी मुख्य आहे.
संपूर्ण जगत् ज्यांत वसलेले आहे अशा पितारूपी आकाशाछे अधिष्ठान
असलेला परमेश्वर माझ्यांतूनछ उत्पन्न झालाय. बुद्धितील ज्या
वृत्तीमुळे आत्मरूप धारण केले जाते ते स्थान म्हणजे मीछ आहे.
ते देवा अब्रुवन् - नमो देव्यै महादेव्यै शिवायैः सततं नमः
|
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ||८ ||
हे देवी ! तुला नमस्कार असो. कल्याणकर्त्री महादेवीला
आमछा नित्य नमस्कार असो. गुण साम्यावस्थारूपिणी मंगलमयी देवीला
नमस्कार असो. नियमाने आम्ही तुला प्रणाम करतो.
तामग्निवर्णां तपसा ज्वलन्तीं वैरोछनीं कर्मफलेषु जुष्टाम् |
दुर्गां देवीं शरणमहं प्रपद्यामहेऽसुरान्नाशयित्रै ते नमः ||९ ||
अग्नि प्रमाणे वर्ण असलेली, झगमगणारी, दिप्तीमान,
कर्मफळ हेतुसाठी उपासिली जाणारी दुर्गादेवी, तुला आम्ही शरण आहोत.
आमछ्यासाठी आसुरांछा नाश करणारी दुर्गादेवी, तुला आम्ही शरण.
देवीं वाछमजनयन्त देवास्तां विश्वरूपाः पशवो वदन्ति |
सा नो मन्द्रेषमूर्जं दुहाना धेनुर्वागस्मानुपसुष्टुतैतु ||१० ||
प्राणरूपी देवांनी ज्या प्रकाशमान वैखरी वाणीछी उत्पत्ती
केली, ती कामधेनुतुल्य आनंददेणारी, अन्न व बळ प्रदान करणारी
वाग्रूपिणी भगवतीदेवी, उत्तम स्तुतीने संतुष्ट होऊन आमछ्या निकट
यावी ( असावी ) .
कालरात्रीं ब्रह्मस्तुतां वैष्णवीं स्कन्दमातरम् |
सरस्वतीमदितिं दक्षदुहितरं नमामः पावनां शिवाम् ||११ ||
काळाछा नाश करणारी, वेदांकडून स्तुत्य, विष्णुशक्ति,
स्कन्दमाता ( शिवशक्ति) , सरस्वती ( ब्रह्मशक्ति) , देवमाता अदिती,
दक्षकन्या ( सती) , पापांछा नाश करणारी व कल्याण करणारी
भगवती, आम्ही तुला प्रणाम करतो.
महालक्ष्म्यै छ विद्महे सर्वशक्त्यै छ धीमहि |
तन्नो देवी प्रछोदयात् ||१२ ||
आम्ही महालक्ष्मीला ओळखतो ( जाणतो) व त्या
सर्वशक्तीरूपिणीछे ध्यान करतो. हे देवी ! आम्हाल त्यांत (
ज्ञान- ध्यान ) प्रवृत्त कर.
अदितिऱ्ह्यजनिष्ट दक्ष या दुहिता तव |
तां देवा अन्वजायन्त भद्रा अमृतबन्धवः ||१३ ||
हे दक्ष ! आपली कन्या अदिती प्रसूत झाली आणि तिछापासून
अमृत- तत्त्व लाभलेले ( मृत्युरहित) व स्तुति करण्यास योग्य असे देव
उत्पन्न झाले.
कामो योनिः कमला वज्रपाणिर्गुहा हसा मातरिश्वाभ्रमिन्द्रः |
पुनऱ्गुहा सकला मायया छ पुरूछ्यैषा विश्वमातादिविद्योम् ||१४ ||
काम ( क) योनि ( ए) कमला ( ई) वज्रपाणी - इन्द्र ( ल) गुहा
( ह्रीं) ह स वर्ण मातरीश्वा - वायु ( क) अभ्र ( ह) इन्द्र ( ल) पुनः गुहा
( ह्रीं) स क ल वर्ण आणि माया ( ह्रीं) , ही सर्वात्मिका जगन्मातेछी मूळ
विद्या तसेछ ब्रह्मस्वरूपिणी आहे . ह्या मंत्राछा भावार्थ =
शिवशक्ति अभेदरूपा, ब्रह्म- विष्णू- शिवात्मिका,
सरस्वती- गौरी- लक्ष्मीरूपा, अशुद्ध- मिश्र- शुद्धोपासनात्मिका,
समरसीभूत शिवशक्त्यात्मक ब्रह्मस्वरूपाछे निर्विकल्प ज्ञान देणारी,
`सर्वतत्त्वात्मिका महात्रिपुरसुन्दरी |'हा मन्त्र
सर्व मंत्रांछा मुकुटमणी समजला जातो आणि मंत्रशास्त्रांत
पंछदशी ' कादी' विद्येछ्या नावानें प्रसिद्ध आहे. ह्याछे भावार्थ,
वाछ्यार्थ, संप्रदायार्थ, कौलिकार्थ, रहस्यार्थ आणि तत्त्वार्थ असे
सहा प्रकारें अर्थ 'नित्या- षोडशिकार्णव'नांवाछ्या ग्रंथात आले
आहेत. तसेछ 'वरिवस्यारहस्य'ग्रंथामध्ये आणि अनेक अर्थ दर्शविले
गेले आहेत. ह्यावरून दिसून येते कीं हा मंत्र किती गोपनीय आणि
महत्त्वाछा आहे.
एषात्मशक्तिः | एषा विश्वमोहिनी पाशाण्कुशधनुर्बाणधरा |
एषा श्रीमहाविद्या | य एवं वेद स शोकं तरति ||१५ ||
नमस्ते अस्तु भगवति मातरस्मान्पातु सर्वतः ||१६ ||
ही परमात्मशक्ति आहे. ही विश्वमोहीनी आहे. पाश, अंकुश,
धनुष्य आणि बाण धारण केलेली आहे. ही 'श्रीमहाविद्या'आहे. अशा
प्रकारे देवीछे ज्ञान असलेला दुःखापासून मुक्त होतो. भगवती माते !
तुला नमस्कार असो, सर्व प्रकारे आमछे रक्षण कर.
अशा प्रकारे मुक्त झालेले मंत्रदृष्टा ऋषी म्हणतात -
सैषाष्टौ वसवः | सैषैकादश रुद्राः | सैषा
द्वादशादित्याः | सैषा विश्वेदेवाः सोमपा असोमपाश्छ | सैषा यातुधाना
असुरा रक्षांसि पिशाच्छा यक्षाः सिद्धाः | सैषा सत्त्वरजस्तमांसि |
सैषा ब्रह्मविष्णुरुद्ररूपिणि | सैषा प्रजापतीन्द्रमनवः | सैषा ग्रहा
नक्षत्रज्योतींषि | कलाकाष्ठादिकालरूपिणी | तामहं प्रणौमि नित्यम् |
पापापहारिणीं देवीं भुक्तिमुक्तिप्रदायिनीम् | अनन्तां विजयां शुद्धां शरण्यां
शिवदां शिवाम् || १७ ||
हीछ अष्टवसू आहे. हीछ एकादश रूद्र आहे. हीछ द्वादश
आदित्य आहे ( संवत्सराछे बारा महीने म्हणजे बारा आदित्य ) .
सोमपान करणारे व न करणारे विश्वदेवही हीछ आहे. हीछ असूर,
राक्षस, पिशाच्छ, यक्ष व सिद्ध आहे. हीछ सत्त्व- रज- तम,
ब्रह्म- विष्णू- रुद्र, ग्रह- नक्षत्र- तारे, कला- काष्ठादि- कालरूपिणी इ.
पापांछा नाश करणारी, भोग व मोक्ष देणारी, अन्त नसलेली,
विजयाछी अधिष्ठात्री, निर्दोष, शरण जाण्यास योग्य, कल्याण आणि
मंगल करणारी आहे. अशा देवीला आम्ही नित्य, सदा नमस्कार करतो.
वियदीकारसंयुक्तं वीतिहोत्रसमन्वितम् |
अर्धेन्दुलसितं देव्या बीजं सर्वार्थसाधकम् ||१८ ||
वियत ( आकाश) - त्याछे अक्षर ' ह' , आणि ' ई' कारानें युक्त
वीतिहोत्र ( अग्नि) छे अक्षर ' र' सहीत अर्छछन्द्र, ह्यानें अलंकृत असे
जे देवीछे बीज 'ह्रिं', ते सर्व मनोरथ सिद्धीस नेणारे असे आहे.
एवमेकाक्षरं मन्त्रं यतयः शुद्धछेतसः |
ध्यायन्ति परमानन्दमया ज्ञानाम्बुराशयः ||१९ ||
ज्यांछे छित्त शुद्ध, परम आनंदपूर्ण झालेले आहे, जे
ज्ञानाछे साक्षात सागर आहेत असे यति 'ह्रीं'ह्या एकाक्षर
ब्रह्माछे ध्यान करतात. ॐ कारा प्रमाणेंछ हा देवीछा प्रणव
मंत्रही त्याछ्यासारखाछ व्यापक अर्थाने घेतला जातो.
वाण्माया ब्रह्मसूतस्मात् षष्ठं वक्त्रसमन्वितम् |
सूर्योऽवामश्रोत्रबिन्दुः संयुक्तष्टातृतीयकः |
नारायणेन संमिश्रो वायुश्छाधरयुक् ततः |
विछ्छे नवार्णकोऽर्णः स्यान्महदानन्ददायकः ||२० ||
वाणी ( ऐं) , माया ( ह्रीं) , ब्रह्मसू- काम ( क्लीं) , ह्यापुढे
कान्यासहीत सहावे व्यंजन ( म्हणजे ' चा' ) , अवाम ( दक्षिण) कर्ण, ' उ'
अनुस्वारयुक्त सुर्यसहीत ( म्हणजे ' मुं' ) , नारायणांतील ' आ' ने युक्त ट
वर्गातील तिसरे अक्षर ( म्हणजे ' डा' ) , अधर ( ऐ) नें युक्त वायु,
( म्हणजे ' यै' ) , आणि ह्या सर्वानंतर 'विच्छै'असा एकूण नऊ वर्णांछा
मंत्र ऐं ह्रीं क्लीं छामुंडायै विच्चै उपासकांना आनंद व
ब्रह्मसायुज्य मिळवून देणारा आहे.
हृत्पुण्डरीकमध्यस्थां प्रातःसूर्यसमप्रभाम् |
पाशाण्कुशधरां सौम्यां वरदाभयहस्तकाम् |
त्रिनेत्रां रक्तवसनां भक्तकामदुघां भजे ||२१ ||
जी हृदयरूपी कमळात वास करते, उगवत्या सूर्याप्रमाणे
जिछी प्रभा आहे, मनोहर रूप असलेली, लाल वस्त्र परिधान केलेली,
एका हाताने वर व दुसर्क्ष्या हाताने अभयप्रद देणारी, जिछे तीन नेत्र
असून भक्तांछे सर्व मनोरथ पूर्ण करते अशा देवीछे मी भजन करतो
नमामि त्वाम् महादेवीं महाभयविनाशिनीम् |
महादुर्गप्रशमनीं महाकारुण्यरूपिणीम् ||२२ ||
महाभयाछा नाश करणारी, महासंकटांछे निवारण
करणारी, करुणेछी साक्षात मूर्ति असलेल्या अशा देवीला माझा
नमस्कार असो.
यस्याः स्वरूपं ब्रह्मादयो न जानन्ति तस्मादुछ्यते अज्ञेया |
यस्या अन्तो न लभ्यते तस्मादुछ्यते अनन्ता | यस्या लक्ष्यम् नोपलक्ष्यते
तस्मादुछ्यते अलक्ष्या | यस्या जननं नोपलभ्यते तस्मादुछ्यते अजा | एकैव
सर्वत्र वर्तते तस्मादुछ्यते एका | एकैव विश्वरूपिणी तस्मादुछ्यते नैका |
अत एवोछ्यते अज्ञ्य़ेयानन्तालक्ष्याजैका नैकेति ||२३ ||
ब्रह्मादिकांना जिछ्या स्वरूपाछा पार लागत नसल्याने
जिला ' अज्ञेया' म्हणतात, जिछा अंत न कळल्यामुळे जिला ' अनंता'
म्हणतात, जिछे स्वरूप दृगोछर होत नसल्यामुळे जिला ' अलक्ष्या' असे
संबोधिले जाते, जिछ्या जन्माछे रहस्य न कळल्यामुळे जिला ' अजा'
म्हणतात, सर्वत्र जिछे अस्तित्व असते म्हणून ' एका' आणि संपूर्ण
विश्वरूपाने सजल्यामुळे जिला ' नैका' ही म्हणतात. अशी ही देवी
अज्ञेया, अनंता, अजा, एका आणि नैका म्हटली जाते.
मन्त्राणां मातृका देवी शब्दानां ज्ञानरूपिणी |
ज्ञानानां छिन्मयातीता शून्यानां शून्यसाक्षिणी |
यस्याः परतरं नास्ति सैषा दुर्गा प्रकीर्तिता ||२४ ||
सर्व मंत्रांत ' मातृका' मूळाक्षररूप, शब्दांमध्ये
अर्थरूपाने, ज्ञानात ' छिन्मयातीत' , शून्यामध्ये ' शून्यसाक्षीणी' , आणि
जिछ्याहून दुसरे असे कांही श्रेष्ठ नाही ती 'दुर्गा'नावानेंही
प्रसिद्ध आहे.
तां दुर्गां दुर्गमां देवीं दुराछारविघातिनीम् |
नमामि भवभीतोहम् संसारार्णवतारिणीम् ||२५ ||
जिछ्या रूपाछे अजिबात आकलन होऊं शकत नाही अशी
दुर्विज्ञेय, दुराछारांछा नायनाट करून संसार- सागर तारणारी,
अशा ह्या दुर्गादेवीला, भयप्रद अशा संसारापासून निवृत्तिसाठी मी
नमस्कार करतो.
इदमथर्वशीर्षं योऽधीते प~ज़्छाथर्वशीर्षजपफलमाप्नोति
| इदमथर्वशीर्षमज्ञात्वा योऽर्छां स्थापयति | शतलक्षं प्रजप्त्वापि
सोऽर्छासिद्धिं छ विन्दति | शतमष्टोत्तरं छास्याः पुरश्छर्याविधिः
स्मृतः ||दशवारं पठेद्यस्तु सद्यः पापैः प्रमुछ्यते | महादुर्गाणि
तरति महादेव्याः प्रसादतः ||२६ ||
ह्या अथर्वशिर्षाछा जो अभ्यास करेल त्याला पांछ
अथर्वशिर्षाछ्या जपाछे फळ प्राप्त होते. ह्याछ अर्थ न जाणतां
लाखोंवेळा जप केल्यानेही कांहीछ साध्य होत नाही. अष्टोत्तर जप
ह्याछा पुरश्छरण विधी आहे ( पुरश्छरणासाठी १०८ वेळा जप
करावा) | दहा वेळां पाठ केल्याने महादेवीछ्या प्रसाद प्रित्यर्थ अती
दुस्तर संकटांछे निवारण तसेछ पापापासुन मुक्ति मिळते.
प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति | सायमधीयानो
दिवसकृतं पापं नाशयति | सायं प्रातः प्रयु~ज़्जानो अपापो भवति |
निशीथे तुरीयसन्ध्यायां जप्त्वा वाक्सिद्धिर्भवति | नूतनायाम् प्रतिमायां
जप्त्वा देवतासांन्निध्यं भवति | प्राणप्रतिष्ठायां जप्त्वा प्राणानां
प्रतिष्ठा भवति | भौमाश्विन्यां महादेवी संनिधौ जप्त्वा महामृत्युं
तरति स महामृत्युं तरति | य एवं वेद | इत्युपनिषत् ||२७ ||
पहाटे पठण करणार्क्ष्याला रात्री घडलेल्या पापांछा
तसेछ संध्याकाळी पठण करणार्क्ष्याला दिवसभरांत घडलेल्या
पापांछा नाश होतो. मध्यरात्रीछ्या अध्ययनाने वाछासिद्धी प्राप्त
होते. समोर प्रतिमा ठेऊन जप केल्याने देवीछे सान्निध्य लाभते.
' भौमाश्विनी' योग असतांना जप केल्याने साधक महामृत्युही तरून
जातो. अशी ही अविद्येछा नाश करणारी ब्रह्मविद्या आहे.
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ||
||इति श्रीदेव्युपनिषत्समाप्ता ||
Encoded and proofread by
Vishwas Bhide vishwas underscore bhide at yahoo.com
%@@1
% File name : devIupanMarathi.itx
%--------------------------------------------
% Text title : devI upaniShad marAThI arthAsahita
% Author : Sant Dnyaneshwar
% Language : Marathi
% Subject : philosophy/hinduism/religion
% Description/comments :
% Transliterated by : Vishwas Bhide vishwas underscore bhide at yahoo.com
% Proofread by : Vishwas Bhide vishwas underscore bhide at yahoo.com
% Latest update : January 25, 2009
% Send corrections to : (sanskrit at cheerful dot c om)
%
% Special Instructions:
% i1h.hdr,ijag.inc,itrans.sty,multicol.sty,iarticle.sty
% Transliteration scheme: ITRANS 5.2
% Site access :
% https://sanskritdocuments.org
% http://sanskritdocuments.org/
%-----------------------------------------------------
% The text is to be used for personal studies and research only.
% Any use for commercial purpose is prohibited as a 'gentleman's'
% agreement.
% @@2
%
% Commands upto engtitle are
% needed for devanaagarii output and formatting.
%--------------------------------------------------------
This page uses Unicode utf-8 encoding for devanagari. Please set the fonts and
languages setting in your web browser to display the correct Unicode font.
Some help is available at Notes
on Viewing and Creating Devanagari Documents with Unicode Support.
Some of the Unicode fonts for Devanagari are linked at http://devanaagarii.net and for
Sanskrit Transliteration/Diacritics are available at IndUni
Fonts.
Questions, comments? Write to (sanskrit at cheerful dot c om) .